उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट करून टाकला वकिली डाव
प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे तर उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलंय. मूळचे जळगावचे असणारे उज्वल निकम भाजपकडून उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरून यंदा लोकसभा लढणार
उत्तर मध्य मुंबईमधून भाजपने वकिली चेहरा शोधून काढलाय. प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे तर उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलंय. मूळचे जळगावचे असणारे उज्वल निकम भाजपकडून उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरून यंदा लोकसभा लढणार आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी होताना दिसणार आहे. उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता भाजपने कट केलाय. पूनम महाजन या दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. २०१४ आणि २०१९ साली पूनम महाजन यांनी याच मतदार संघातून विजय मिळवला होता मात्र आता तिसऱ्यांदा पूनम महाजनांचा पत्ता कट करत भाजपने वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे आता नेमका विजय कोणाचा होणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
Published on: Apr 28, 2024 10:38 AM
Latest Videos