‘स्वाभिमानी, लाचार नाही, त्यांना बाहेर काढा नाहीतर आपण…’, अजितदादांना कोणाची विनंती?
"अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता आपण मांडीला मांडी लावून बसलो आहोत परंतु बाहेर आल्यावर उलट्या होतात,", असे तानाजी सावंत म्हणाले होते. तर यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. बघा नेमकं काय म्हणाले उमेश पाटील?
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरुन महायुतीमध्ये चांगलाच वाद रंगताना पाहायला मिळतोय. तानाजी सावंतांच्या विधानानंतर अजित दादा यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने अजित पवार यांनाच सत्तेतून बाहेर पडू असे आवाहन केलं आहे. माझी वैक्तिगतरित्या अजित पवार यांना विनंती आहे, असं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीतून बाहेर पडलेलं चांगलं. आपण सत्तेसाठी लाचार आहोत का? असा सवालही उमेश पाटील यांनी केला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेत, अजित पवार मुख्यमंत्री झालेत आणि हे सरकार आलं. सरकार आल्याने तानाजी सावंत हे मंत्री झालेत, असे म्हणत उमेश पाटील यांनी तानाजी सावंत यांना फटकारलं आहे. तर या पद्धतीने तानाजी सावंत किंवा इतर कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घेणार नाही, त्यामुळे माझी माझ्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे, आपण स्वाभिमानी आहोत, कोणाच्या घरी खायला जात नाहीत. अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंत याला बाहेर काढा नाहीतर आम्ही तरी बाहेर पडतो, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी घेतला आहे.