Pune Lal Mahal : लाल महालात अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुद्धीकरण, लाल महालातला ‘तमाशा’ भोवला!

Pune Lal Mahal : लाल महालात अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुद्धीकरण, लाल महालातला ‘तमाशा’ भोवला!

| Updated on: May 21, 2022 | 12:55 PM

Pune Lal Mahal : लाल महालातला ‘तमाशा’ भोवला! फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे : पुण्याच्या लालमहालात (Pune Lal Mahal) विनापरवानगी लावणी नृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये (Faraskhana police station) तिघांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेने यासंबंधी तक्रार केली होती. यानुसार वैष्णवी पाटीलसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी पाटीलसह कुलदीप बापट, केदार अवसरे यांच्यावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुद्धीकरण करण्यात आलंय.

Published on: May 21, 2022 12:55 PM