मूल झाल्यावर आईप्रमाणंच वडिलांनाही मिळणार 12 आठवड्यांची सुट्टी!
पॅटर्निटी लिव्ह अंतर्गत फायझर कंपनीत काम करणाऱ्यांना वडीलांना चार टप्प्यामध्ये ही पॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे. तसेच बायोलॉजिकल बाळांच्या वडीलांनाही ही 12 आठवड्यांची सुट्टी लागू होणार आहे.
मुंबई : कामाचा व्याप किंवा सुट्टीन मिळणे यामुळे अनेकांना पॅटर्निटी लिव्ह मिळत नाही. आता पॅटर्निटी लिव्ह म्हटलं की हा महिलांचा विषय. पण बापाला होणाऱ्या बाळापासून दूर रहावं लागत त्याचं काय? यावर आता मोठा कौतुकास्पद निर्णय फायझर कंपनीने घेतला आहे. फायझर कंपनीने वडील झाल्यावर कर्मचाऱ्यांना 12 आठवड्यांची सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
पॅटर्निटी लिव्ह अंतर्गत फायझर कंपनीत काम करणाऱ्यांना वडीलांना चार टप्प्यामध्ये ही पॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे. तसेच बायोलॉजिकल बाळांच्या वडीलांनाही ही 12 आठवड्यांची सुट्टी लागू होणार आहे. याबाबत अधिकृत धोरण फायझर कंपनीने गुरुवारी जाहीर केले आहे
पॅटर्निटी लिव्ह अंतर्गत वडील झाल्यावर कर्मचाऱ्याला कंपनीकडून कमीत कमी दोन आठवडे आणि जास्तीत जास्त सहा आठवड्यांपर्यंत सुट्टी घेता येणार आहे. तर 12 आठवड्यांची पितृत्व रजा पॉलिसीमुळे पुरुष सहकाऱ्यांना आणि त्यांच्या जोडीदाराबरोबर पालकत्वाचा आनंद घेता येणार आहे.