Budget 2024 : अर्थसंकल्पासंदर्भात मोदींचं कॅबिनेट बैठकीत मोठं वक्तव्य, कसं असणार बजेट एका वाक्यात सांगितलं
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पावर औपचारिकरित्या चर्चा झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. यानंतर अर्थसंकल्पाच्या कॉपी संसद भवनात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या दाखल झाल्यात
नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२४ : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर होणार आहे. अंतरिम बजेट हे देशासाठी चांगलं असणार, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत कॅबिनेट बैठकीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पावर औपचारिकरित्या चर्चा झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. यानंतर अर्थसंकल्पाच्या कॉपी संसद भवनात घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 2024 – 2025 अर्थसंकल्पाचं वाचन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या अंतरिम अर्थसंकल्पाकडे सर्वच क्षेत्रातील लोकांच्या नजरा लागल्या आहेत. तर या अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.