Union Budget 2025 : अर्थमंत्र्यांचा मध्यमवर्गीयांवर फोकस, नोकरदारांना मोठा दिलासा; अशी असणार नवी कररचना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना अखेर मोदी सरकार करदात्यांना पावले असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सर्वसामान्य, मध्यमवर्ग ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळाले. अर्थसंकल्पीय भाषणाचा समारोप करताना, अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गीयांची इच्छा पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. […]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना अखेर मोदी सरकार करदात्यांना पावले असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सर्वसामान्य, मध्यमवर्ग ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळाले. अर्थसंकल्पीय भाषणाचा समारोप करताना, अर्थमंत्र्यांनी मध्यमवर्गीयांची इच्छा पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. कारण आता देशात १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील नोकरदारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात नवीन कर व्यवस्थेअंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केल्याप्रमाणे 0-8 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर द्यावा लागणार आहे. 8-12 लाखापर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्यांना दहा टक्के, 12-16 लाखापर्यंतच्या कमाईवर 15 टक्के आयकर द्यावा लागेल. 16 ते 20 लाख उत्पन्नावर 20 टक्के आयकर तर 20 लाख ते 24 लाख उत्पन्नावर 25 टक्के कर द्यावा लागणार आहे.

जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती

बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण

संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य

सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप
