Union Budget 2025 Video : निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार, ‘या’ 8 घोषणा होण्याची शक्यता
अर्थसंकल्पकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. तर विशेष बदलांच्या पार्श्वभूमीवर तर अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर करदात्यांसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात नेमकं काय असणार ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलणार असल्याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी नेमक्या काय योजना असतील याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर शेतकरी, महिला, युवा, आरोग्य आणि शिक्षणासाठी अर्थसंकल्पात काय नेमक्या तरतुदी करण्यात आल्यात तेही लवकरच स्पष्ट होणार आहे.
नव्या करधोरणानुसार आता केंद्र सरकार 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची शक्यता आहे. 15 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी 25% कर होण्याची चिन्ह आहे. सध्या 30 टक्के कर द्यावा लागतोय. तर एक्साइज ड्युटी कमी करण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची चिन्ह आहे. यासोबतच पीएम किसान निधीची रक्कम वाढण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या वार्षिक रक्कम ही 6000 रुपये दिली जाते. रोजगारशी संबंधित तरतुदी वाढवल्या जाऊ शकतात. एकीकृत राष्ट्रीय रोजगार धोरण सरकारतर्फे आणलं जाण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. तर आरोग्य सेवांवरील खर्च वाढवला जाण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जातेय. गृह कर्जावर मिळणाऱ्या व्याज सवलतीची रक्कम ही 2 लाख रुपये आहे जी 5 लाख रुपये केली जाण्याची शक्यता आहे. कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्सची संबंधित पार्टवरची इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला गेला तर मोबाईल स्वस्त होऊ शकतात.

जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती

बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण

संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य

सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप
