Breaking | केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा राजीनामा ; सूत्रांची माहिती

Breaking | केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा राजीनामा ; सूत्रांची माहिती

| Updated on: Jul 07, 2021 | 3:42 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळतेय. कोरोना संकटाच्या काळात काही राज्य सरकारांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन वारंवार निशाणा साधला होता. त्यावेळी डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होत असताना डॉ. हर्षवर्धन यांना आरोग्यमंत्रीपदावरुन हटवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, डॉ. हर्षवर्धन यांना दुसरं खातं मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 07, 2021 03:42 PM