ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले? महाराष्ट्रानं माहिती दिली नाही
संसदेचं (Parliament Winter Session) हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. लोकसभेत (Lok Sabha ) कोरोना विषाणू संसर्गावर (Corona Virus) चर्चा सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी कोरोना संदर्भात लोकसभेत निवेदन केलं.
नवी दिल्ली: संसदेचं (Parliament Winter Session) हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. लोकसभेत (Lok Sabha ) कोरोना विषाणू संसर्गावर (Corona Virus) चर्चा सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी कोरोना संदर्भात लोकसभेत निवेदन केलं. मनसुख मांडवीय यांनी आम्ही राज्यांकडे ऑक्सिजनमुळं किती जण दगावले असल्याची माहिती मागवली होती, असं सांगितलं. मात्र, केवळ 19 राज्यांनी माहिती दिली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारनं ऑक्सिजन अभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती दिली नसल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
Latest Videos