पुण्यात भाजपमध्ये नाराजी नाट्य, नितीन गडकरी यांनी स्वतः काढली मेधा कुलकर्णी यांची समजूत

पुण्यात भाजपमध्ये नाराजी नाट्य, नितीन गडकरी यांनी स्वतः काढली मेधा कुलकर्णी यांची समजूत

| Updated on: Aug 12, 2023 | 5:52 PM

VIDEO | भाजपमधील अंतर्गत धुसफुसीच्या चर्चांना पुन्हा उधाण, पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता मात्र चर्चा झाली भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची...

पुणे, १२ ऑगस्ट २०२३ | चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या परिपत्रक पाहिल्यानंतर पुण्यात भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला सातत्याने डावलण्याचं काम पक्षातील काही जणांकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीची दखल नितीन गडकरी यांनी घेतली. नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यांनी मेधा कुलकर्णी यांची समजूत काढली. गडकरींनी मेधा यांना पक्षातील वरिष्ठांना भेटून विषय संपवण्याची सूचना केली. त्यानंतर पक्षातील वरिष्ठांच्या कानावर माझी नाराजी टाकली असून वरिष्ठांनी मला वेळ दिल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी दिली. तसेच नितीन गडकरी घरी आल्याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली. “नितीन गडकरी घरी येऊन गेले याचा मला आनंद आहे. त्यांनी मला आशीर्वाद दिले. वरिष्ठ मला वेळ देणार आहेत . त्या वेळेला मी वरिष्ठांशी बोलणार आहे. यापेक्षा जास्त आज मी काही बोलणार नाही. मला वेळ दिलेली आहे आणि स्वतः गडकरीही आज मला भेटून गेले आहेत”, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली.

Published on: Aug 12, 2023 05:52 PM