Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Shah : शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं

Amit Shah : शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं

| Updated on: Apr 12, 2025 | 2:14 PM

'आज शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी आहे. मी शिवचरित्र वाचलं आहे. जिजाऊ माँ ने केवळ शिवाजी महाराजांना जन्म दिला नाही. स्वराज, स्वधर्म आणि भाषेचा पुनरुधार करण्याची प्रेरणाही दिली. एक बालशिवाजीला समग्र देशाला एकत्र आणि स्वतंत्र करण्याचा विचार दिला.' असं शाह म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे किल्ले रायगडावर दाखल झालेत. यावेळी रायगड किल्ल्यावर आयोजित सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी शिवचरित्र प्रत्येक भारतीयांना शिकवलं गेलं पाहिजे. प्रत्येक मुलाला शिकवलं पाहिजे. शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका, असे म्हटले. पुढे त्यांनी आपल्या भाषणात असेही म्हटले की, देश आणि जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे. स्वधर्माचा अभिमान, स्वराज्याची आकांक्षा आणि स्वभाषेला अमर बनवणे हे तीन विचार देशाच्या सीमेशी संबंधित नाही. मानव जीवनाच्या स्वाभिमानाशी जोडले आहेत. शिवाजी महाराजांनी हे विचार जगासमोर ठेवले. जेव्हा आक्रमकांनी आपल्यावर सत्ता गाजवली. गुलामीची मानसिकता रोवली तेव्हा शिवाजी महाराजांनी हे विचार दिला. मी भाषण करायला आलो नाही, राजकारण करायला आलो नाही. मी शिवाजी महाराजांच्या विचाराची अनुभूती घ्यायला आलो. मला शिव मुद्रा भेट म्हणून मिळाली. शिवमुद्रा जगासाठी आदर्श आहे. भारतासाठीस आहेच.

शिवरायांवर बोलताना अमित शाह म्हणाले, शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा देशातील जनता अंधकारात होती. कुणाच्या मनात स्वराज्याची कल्पनाही येऊ शकत नव्हती. दक्षिणेचंही पतन झालं,. त्यामुळे स्वराज्य आणि स्वधर्माची गोष्ट लोकांना गुन्हा वाटू लागली. पण १२ वर्षाचा मुलगा सिंधू पासून कन्याकुमारीपर्यंत भगवा फडकवण्याची शपथ घेतली.  मी अनेक वर्षानंतर रायगडावर आलो. सिंहासनाला अभिवादन करताना माझ्या मनातील भाव मी सांगू शकत नाही. ज्याने स्वधर्मासाठी, स्वराज्यासाठी मरण्याची एक जिगविषा निर्माण केली. त्यांच्या सभेत मी आज उभा आहे. मला हे वर्णन शब्दात सांगता येत नाही. अटकपासून कटकपर्यंत आणि तामिळनाडू, गुजरातसमेत सर्व देशाला स्वराज्याचं स्वप्न यशस्वी होताना दिसत होतं.

 

Published on: Apr 12, 2025 02:10 PM