'राहुल गांधी यांचं लग्न झालं नाही तर राज्याभिषेक काय होणार?' कुणी लगावला खोचक टोला

‘राहुल गांधी यांचं लग्न झालं नाही तर राज्याभिषेक काय होणार?’ कुणी लगावला खोचक टोला

| Updated on: Jun 06, 2023 | 10:43 AM

VIDEO | नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला कुणाचं प्रत्युत्तर?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलंय. 29 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासूनच वैदिक रिती रिवाजानुसार भव्य सोहळा पाहायला मिळाला. या सोहळ्याला सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि तृणमूलसह 19 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट केलं आणि त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या उद्धाटनाला राज्याभिषेक समजतायत. या केलेल्या टीकेवरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आणि त्यांना प्रत्युत्तर देत टोलाही लगावल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ‘राहुल गांधी यांचा कधी राज्याभिषेक होऊ शकणार नाही. राहुल गांधीचं अजून लग्न झालं नाही तर राज्याभिषेक दूरच राहिला.’

Published on: Jun 06, 2023 10:18 AM