Bharati Pawar | देशात लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती नाही : भारती पवार

| Updated on: Jan 03, 2022 | 7:05 PM

जिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त, तिथे लॉकडाऊन अथवा निर्बंध, कंटेन्मेंट झोनबाबत राज्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावे. जिथे रूग्णसंख्या वाढतेय, तिथे ऑक्सिजन, बेड्सची उपलब्धता आणि अन्य आरोग्य सुविधांचा विचार करून राज्यांनी कठोर निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा.

नाशिक : मागील महिन्यापासून ओमिक्रॉनबाबत केंद्राने सर्व राज्यांना गाईडलाईन्स दिल्यात. ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने होतोय. जिथे केसेस वाढतायत, तिथे केंद्राचं पथक मदत करतंय. ओमिक्रॉनबाबत सर्वांनी सतर्क राहण्याची गरज, सर्वांनी नियमांचं पालन करावं. जिनोम सिक्वेन्सिंग लॅब वाढवण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. जिथे पॉझिटिव्हिटी रेट जास्त, तिथे लॉकडाऊन अथवा निर्बंध, कंटेन्मेंट झोनबाबत राज्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावे. जिथे रूग्णसंख्या वाढतेय, तिथे ऑक्सिजन, बेड्सची उपलब्धता आणि अन्य आरोग्य सुविधांचा विचार करून राज्यांनी कठोर निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा. 23 हजार कोटींचं पॅकेज केंद्राने दिलं, मात्र केवळ 17 टक्केच निधीचा वापर झालाय. ecr 2 पी पॅकेजमधील कामं संथ गतीनं, कामांना गती देण्याची गरज आहे. रुग्णसंख्या वाढली तर महाराष्ट्र सरकारही पश्चिम बंगालसारखा कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिली आहे.