राणे, बावनकुळेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला अंधारेंचे उत्तर, म्हणाल्या…
अंधारे यांनी राणे यांना, पत्रकार परिषद घ्यायच्या आधी सभागृहाच्या पटलावर राणे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय काय बोलले आहेत ते एकदा बघून घ्यावं असं म्हटलं आहे
ठाणे : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्या फडतूस या टीकेवरून टीका करताना इशारा दिला होता. त्यांनी, पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तर घराबाहेर पडू देणार नाही असे म्हटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणे आणि बावनकुळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
अंधारे यांनी राणे यांना, पत्रकार परिषद घ्यायच्या आधी सभागृहाच्या पटलावर राणे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय काय बोलले आहेत ते एकदा बघून घ्यावं. फडणवीस यांच्या प्रेमाखातर पत्रकार परिषद घेणार असाल तर फडणवीस यांचं तुमच्याबद्दलचं म्हणणं काय आहे? भावना काय आहेत? त्या आधी ओळखून घ्या असा टोमणा मारला आहे. तर बावनकुळे यांना आपण सहर्ष निमंत्रण दिलेलं आहे. त्यांनी 48 तासाच्या आत मातोश्रीवर कधीही येऊन दाखवावं. 48 तासाच्या आत आले तर चहा पान देऊन आपण त्यांचं स्वागत करू असे त्या म्हणाल्या

न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल

बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव

धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
