मी योग्य वेळी शिवसेना सोडली करण…, नारायण राणे यांनी स्पष्टच सांगितलं अन् काय म्हणाले बघा
VIDEO | आजच्या चांगल्या दिवशी, देवाच्या दारी उद्धव ठाकरे यांचं नाव नको, असं का म्हणाले नारायण राणे? बघा व्हिडीओ
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सहकुटुंब महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वरचे दर्शन घेतले. नारायण राणे यांच्या सोबत त्यांची पत्नी निलम राणे, पुत्र आमदार नितेश राणे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण राणे यांनी सहपत्नीक कुणकेश्वरची पूजाही केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी टीका केली यावर भाष्य करता नारायण राणे म्हणाले, आजच्या चांगल्या दिवशी उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊ नकोस. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मराठी माणूस किंवा हिंदुत्वासाठी न चालवता ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखी चालवली म्हणून त्यांची अशी अवस्था होणारच होती. हिंदुत्वासोबत तडजोड करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांनी काही बोलूच नये म्हणत नारायण राणे यांनी जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी ते स्वतः शिवसेनेतून बाहेर का पडले याचे कारणही सांगितले.