Special Report | मिलिंद नार्वेकर नवे शिवसेनाप्रमुख आहेत का ? नारायण राणेंचा खोचक सवाल
मिलिंद नार्वेकर यांनी आज 6 डिसेंबरचे निमित्त साधून एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत बाबरी मशीद पाडण्यासाठी जमाव मशिदीवर चढत असल्याचे दिसते आहे. शिवाय त्या फोटोवर एक ओळ लिहिलेली आहे. त्यात असे म्हटले आहे की, अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन…या ट्वीट संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अतिशय खोचक शब्दांत टोलेबाजी केली.
मिलिंद नार्वेकर यांनी आज 6 डिसेंबरचे निमित्त साधून एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत बाबरी मशीद पाडण्यासाठी जमाव मशिदीवर चढत असल्याचे दिसते आहे. शिवाय त्या फोटोवर एक ओळ लिहिलेली आहे. त्यात असे म्हटले आहे की, अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन…या ट्वीट संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अतिशय खोचक शब्दांत टोलेबाजी केली. मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला. यापूर्वी मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करून राणे यांनी राजकीय राळ उठवून दिली होती. त्यानंतर काही काळ सौम्य झालेले राणे आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक होत असलेले पाहायला मिळतायत.
आजच्याच दिवशी 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत 16 व्या शतकात बांधण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यानंतर देशभर दंगली उसळल्या. त्यात जवळपास दोन हजार लोक मारले गेले. हा इतिहास सर्वांना माहितच आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल, तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले. स्वतः शिवसेना आज महाविकास आघाडीत असली तरी कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार आजवर करत आली आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांनी आज सकाळी एक ट्वीट केले आहे.