Nilesh Rane : बाकी काही कारण नाही पण…, मंत्री नारायण राणे यांच्या सुपुत्राची राजकारणातून निवृत्ती
VIDEO | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याची केली घोषणा, कारण स्पष्ट करत सक्रीय राजकारणातून बाजूला... म्हणाले, 'मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन काही.... '
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि नितेश राणे यांचे मोठे बंधू खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आणि यासंदर्भातील ट्वीट देखील त्यांनी केले आहे. मात्र अचानक सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचे कारण निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. ‘मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही’, असे निलेश राणे यांनी म्हटले तर मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.