नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्याकडून चिपळूणच्या बाजारपेठेची पाहणी
केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत येऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी नारायण राणे यांना गराडा घातला आणि आपलं गाऱ्हाणं मांडलं. दादा, तुम्ही कोकणासाठी दैवत आहात. तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता. आमचं सर्व काही पुरात वाहून गेलं आहे. आमचं कंबरडं मोडलं आहे. आम्हाला तातडीने मदत करा, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली. तसेच, अलोरा येथे काही नियोजन केल्यास पुराचं पाणी समुद्राज जाऊ शकतं. त्यामुळे पुराचा प्रश्न कायमचा सोडवला जाऊ शकतो, असं या व्यापाऱ्यांनी राणेंना सांगितलं.
Latest Videos