मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य, नारायण राणे अलिबाग गुन्हे शाखेत हजेरी लावणार
केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल दाखल झालेल्या प्रकरणात अलिबाग गुन्हे शाखेत हजर राहणार आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल दाखल झालेल्या प्रकरणात अलिबाग गुन्हे शाखेत हजर राहणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार नारायण राणे अलिबाग गुन्हे शाखेसमोर हजर होत आहेत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. जामीन मंजूर केल्यानंतर कोर्टान दिलेल्या आदेशानुसार न्यायालयाचा सन्मान म्हणून नारायण राणे हे अलिबाग पोलीस दलात हजर होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर केला होता. नारायण राणे चौकशीला सहकार्य करतील, अशी माहिती नारायण राणे यांचे वकिल संग्राम देसाई यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्या अटकेचं प्रकरण देखील चांगंलंच गाजलं होतं.
Latest Videos