गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे Nawab Malik यांना अटक
तपासणी झाल्यानंतर त्यांना कोर्टात सादर करण्यात आलं. दोन्ही बाजूच्या युक्तीवाद झाल्यानंतर नवाब मलिकांना कोर्टाकडून 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली.
बुधवारी सकाळी नवाब मलिकांना (nawab malik) अटक केल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी नवाब मलिकांना राजकीय हेतूने अटक केल्याचे सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून सांगितले. त्यावर भाजपचे नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) म्हणतात की, नवाब मलिकांना राजकीय हेतुने अटक करण्यात आलेली नाही, तर त्यांनी वादग्रस्त जमीन खरेदी केली असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असा आरोप त्यांनी केला आहे. कारण बुधवारी सकाळी ईडीचे अनेक अधिकारी त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर त्यांच्या घरी त्यांची अनेक तास चौकशी झाली. त्यानंतर नवाब मलिकांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं. तिथून त्यांना जे. जे. रूग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलं. तपासणी झाल्यानंतर त्यांना कोर्टात सादर करण्यात आलं. दोन्ही बाजूच्या युक्तीवाद झाल्यानंतर नवाब मलिकांना कोर्टाकडून 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली.