WITT Global Summit : ‘असे प्रश्न फक्त महिलांनाच का?’, कोणत्या प्रश्नावर स्मृती इराणी यांनी खोचकपणे केला उलट सवाल?
TV9 व्हॉट इंडिया थिंक्स टुडेज ग्लोबल समिटच्या दुसऱ्या दिवशी नारी शक्ती विकसित भारत सत्रात बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रश्नावर अँकर निशांत चतुर्वेदी यांना खोचकपणे उलट सवाल करत त्यांची फिरकी घेतली.
नवी दिल्ली | 26 February 2024 : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी TV9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ ग्लोबल समिटच्या नारी शक्ती विकसित भारत या सत्रात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. दरम्यान, त्यांना आवर्जून एक प्रश्न विचारला असता त्यांनी उलट सवाल करत असे म्हटले की, ‘असा प्रश्न फक्त महिलांनाच का विचारला जातो?’ TV9 व्हॉट इंडिया थिंक्स टुडेज ग्लोबल समिटच्या दुसऱ्या दिवशी नारी शक्ती विकसित भारत सत्रात बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रश्नावर अँकर निशांत चतुर्वेदी यांना खोचकपणे उलट सवाल करत त्यांची फिरकी घेतली. या कार्यक्रमात अँकर निशांत चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना विचारले की, तुम्ही घर आणि ऑफिस एकत्र कसे सांभाळता? या प्रश्नावर केंद्रीय मंत्री म्हणाल्या की हा प्रश्न फक्त महिलांनाच का विचारला जातो. याआधीही अनेक लोक इथे आले आहेत, त्यांना का हा प्रश्न विचारण्यात आला नाही? बघा व्हिडीओ