ST Employee Strike | मोबाईलमधील फ्लॅश लाईट सुरु करुन आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं अनोखंं आंदोलन
आज (21) नोव्हेंबर या कर्मचाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांनी आपापल्या मोबाईलचे फ्लॅशलाईट सुरु करुन रात्रीच्या अंधारात देखील आमचा लढा चालू असल्याचा समस्त महाराष्ट्राला संदेश दिला.
मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रभर परसलीय. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण तसेच अन्य मागण्यांना घेऊन हे आंदोलन सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदान हे या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे. येथे शेकडो एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. आज (21) नोव्हेंबर या कर्मचाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांनी आपापल्या मोबाईलचे फ्लॅशलाईट सुरु करुन रात्रीच्या अंधारात देखील आमचा लढा चालू असल्याचा समस्त महाराष्ट्राला संदेश दिला. यावेळी सदाभाऊ खोत आंदोलकांना मार्गदर्शन करत होते. सर्वांनी किमान दहा मिनिटे फ्लॅशलाईट सुरु करा असे आवाहन खोत करत होते. तसेच आझाद मैदानावर हे चांदणं फुललं आहे. हे चांदणं समस्त महाराष्ट्राला दिसू द्या, असेदेखील कर्मचाऱ्यांना सांगत होते.
Latest Videos