अहिराणी अन् खान्देशी गाण्यांवर झुंबा… ZP शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल
नाशिकच्या मालेगावच्या उंबरधे जिल्हा परिषद शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षक भारत पाटील यांनी त्यास झुंबा डान्सची जोड दिली. विशेष म्हणजे अहिराणी, खानदेशी आवडत्या लोकगीतांच्या तालावर विद्यार्थी उत्साहात वर्कआऊट करतात. पाय, गुडघे, कंबर, हात, खांदे, मान यांच्या योग्य हालचाली घेऊन विद्यार्थ्यांचा तालबद्ध व्यायाम
एरव्ही विद्यार्थ्यांना शाळेत कवायती, व्यायाम बोअरिंग वाटतो . मात्र नाशिकच्या मालेगावच्या उंबरधे जिल्हा परिषद शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत तंत्रस्नेही शिक्षक भारत पाटील यांनी त्यास झुंबा डान्सची जोड दिली. विशेष म्हणजे अहिराणी, खानदेशी आवडत्या लोकगीतांच्या तालावर विद्यार्थी उत्साहात वर्कआऊट करतात. पाय, गुडघे, कंबर, हात, खांदे, मान यांच्या योग्य हालचाली घेऊन तालबद्ध व्यायाम करतात संगीतासोबत वर्कआऊट करत असल्याने स्नायू बळकट होतात. मानसिक स्वास्थ तंदुरूस्त राहण्यासह रक्तदाब सुधारतो. कॕलरीज बर्न करता येतात. तर झुंबा डान्सचे अनेक फायदे होतात. दर आठवड्याला वेगवेगळ्या खान्देशी गीते व संगीतासोबत मुलांना मिळणारा आनंद काही औरच असतो. सर्वच विद्यार्थी यात सहभागी होतात. शरीरात नवी ऊर्जा निर्माण होऊन मुलांच्या मनात उत्साह निर्माण होऊन शाळेविषयी आपुलकी गोडी निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना फायदे कमी अधिक प्रमाणात माहिती असतील नसतील पण आपल्याला नाचायला, उड्या मारायला, मनासारख्या कृती करायला मिळते ना बस्स मग. दर शनिवारी विद्यार्थी शाळेत हजेरी लावतात…सर, झुंबा करू ना… नाचो..नाचो …विथ झुंबा डान्स करण्याचाच आग्रह धरताना दिसतात.