जितेंद्र आव्हाड यांच्या घरी बॉम्ब? 'त्या' निनावी फोननं वाढवलं टेन्शन अन्...

जितेंद्र आव्हाड यांच्या घरी बॉम्ब? ‘त्या’ निनावी फोननं वाढवलं टेन्शन अन्…

| Updated on: Feb 04, 2024 | 2:54 PM

रात्री १२ वाजता ठाणेनगर पोलीस कंट्रोल रूमला निनावी फोन आल होता. यानंतर पोलिसांकडून रात्री १२ वाजता आव्हाडांच्या घराची तपासणी करण्यात आली. मात्र पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात त्यांना जितेंद्र आव्हाड यांच्या घरी काहीच आढळून आले नाही

ठाणे, ४ फेब्रुवारी, २०२४ : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याची माहिती मिळतेय. रात्री १२ वाजता ठाणेनगर पोलीस कंट्रोल रूमला निनावी फोन आल होता. यानंतर पोलिसांकडून रात्री १२ वाजता आव्हाडांच्या घराची तपासणी करण्यात आली. मात्र पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात त्यांना जितेंद्र आव्हाड यांच्या घरी काहीच आढळून आले नाही. दरम्यान या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्यातील लक्ष्मीनगर भागात नाद नावाचा बंगला आहे. त्यांच्या या निवासस्थानी बॉम्ब असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, बॉम्ब शोधक पथक, वर्तकनगर पोलीस त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. यानंतर त्यांनी आव्हाडांच्या घराची तपासणी केली. मात्र कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही.

Published on: Feb 04, 2024 02:54 PM