प्रकाश आंबेडकरांच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, भाजप खासदाराची टीका

“प्रकाश आंबेडकरांच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही”, भाजप खासदाराची टीका

| Updated on: Jun 18, 2023 | 10:23 AM

शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं असताना आंबेडकरांनी औरंगजेबाच्या समाधीजवळ नतमस्तक झाल्याने टीकेचे सूर उमटू लागले आहेत.

जळगाव: शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं असताना आंबेडकरांनी औरंगजेबाच्या समाधीजवळ नतमस्तक झाल्याने टीकेचे सूर उमटू लागले आहेत.आंबेडकरांच्या या कृतीवर शिवसेना आणि भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी “प्रकाश आबेंडकर यांना महाराष्ट्र माफ करणार नाही”, असं म्हटलं आहे. “औरंगाबदच्या दौऱ्यात प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्याचं पाप केलं आहे कारण हा प्रश्न जात, धर्म, पक्ष यांच्या पलिकडे आहे. शिवरायांच्या स्वराज्यात, ठाकरे गटासोबत जाऊन महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या कृत्याचा आम्ही निषेध करतो,” असं उन्मेश पाटील म्हणाले.

Published on: Jun 18, 2023 10:23 AM