राज्यातील अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार सतर्क, दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
VIDEO | राज्यात अवकाळी पावसाचं नुकसान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदना, बघा काय म्हणाले...
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचं नवं संकट उभं ठाकलंय. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा प्रकोप होतोय. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या अवकाळी पावसाचं नुकसान बघता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय त्यांनी या नुकसान भरपाईची गंभीर दखल घेतली असून तातडीने अधिकाऱ्यांना पंचनामा करुन नुकसान भरपाईबद्दलचे त्यांनी आदेश दिले आहेत. संबंधित भागांमध्ये तातडीने पंचनामे करावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार सतर्क होत त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Published on: Mar 06, 2023 09:32 PM
Latest Videos