नाशिकला अवकाळीने झोडपले; आमदार दिलीप बोरसे शेतकऱ्यांच्या बांधावर

| Updated on: Apr 08, 2023 | 8:55 AM

नाशिकला देखिल अवकाळीने झोडपले असून याचा फटका सटाणा तालुक्यातील आखतवाडे परिसरात शेतकऱ्यांना बसला आहे

सटाणा (नाशिक) : राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अवकाळीला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. ज्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नाशिकला देखिल अवकाळीने झोडपले असून याचा फटका सटाणा तालुक्यातील आखतवाडे परिसरात शेतकऱ्यांना बसला आहे. येथे काल सायंकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्यासह शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी शेताच्या बांधावर जात पाहणी केली. अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देत शासनाकडून नुकसानीची भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.बोरसे यांनी या पाहणीवेळी सांगितले.

Published on: Apr 08, 2023 08:44 AM
पुन्हा अवकाळीचा धुमाकूळ ; पुढील 48 तासांत अवकाळी पावसाचा अंदाज
अमरावती जिल्ह्यातील एसटीच्या 50 फेऱ्या बंद; एसटी महामंडळाला तब्बल स्वव्वा कोटींचा फटका