'नुकसान भरपाई कधी मिळणार?' चिंताग्रस्त संत्रा उत्पादकांचा सरकारला थेट सवाल

‘नुकसान भरपाई कधी मिळणार?’ चिंताग्रस्त संत्रा उत्पादकांचा सरकारला थेट सवाल

| Updated on: Apr 29, 2023 | 2:50 PM

VIDEO | नागपूरातील शेतकरी संत्रा नुकसान भरपाई आणि मदतीपासून वंचीत, सरकारला काय केला थेट सवाल?

नागपूर : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्हे बाधित झाल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक विवंचनेच सापडला आहे. नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संत्रा आणि मोसंबीचं मोठं नुकसान झाले आहे. पण अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली, मग नागपूर जिल्हा मात्र यापासून वंचित राहिला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांनी केलाय. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात हा मुद्दा उचलल्या गेला होता. सरकारच्या वतीने नुकसान भरपाईची देण्याचं आश्वासनही दिलं. पण नुकसान भरपाई मिळाली नाही. एकीकडे अवकाळी पावसामुळं संत्रा पिकाला फटका बसला. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर देण्याची मागणी सलील देशमुख यांच्याहस शेतकऱ्यांनी केलीय.

Published on: Apr 29, 2023 02:50 PM