नांदेडच्या बिलोली तालुक्याला अवकाळीनं झोडपलं, फळबागांसह घरांचं नुकसान
VIDEO | नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं, अनेक कच्च्या घरांचे मोठे नुकसान
नांदेड : गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने जिल्ह्यातील फळबागांच्या पिकाचे मोठ्यप्रमाणावर नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढलंय, त्यामुळे बिलोली तालुक्यातील अनेक कच्च्या घरांचे मोठे नुकसान झालंय. तर जागोजागी विद्युत खांब आणि तारा तुटल्यामुळे बिलोली तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे अनेक गावांना रात्र अंधारातच काढावी लागलीय. या वादळी वाऱ्याने फळबागांचे जबर नुकसान झालेय, विशेषतः आंबा आणि चिकूच्या बागांत फळं खराब होऊन फळांचा सडा पडलाय. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेय. तसेच सर्वसामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेय. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसानं कहर केलंय. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला. अवकाळी पावसाने पिकांचं मोठं नुकसानं झालं तर या संकटामुळे शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. गारांचा खच शेतात पाणीच पाणी त्यामुळे पिकांची नासाडी झाली. पशुधनाची हानी झाली तर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली आहे.