अवकाळीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला, बळीराजाला मोठा फटका, पीकं उद्धस्त

अवकाळीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला, बळीराजाला मोठा फटका, पीकं उद्धस्त

| Updated on: May 04, 2023 | 9:22 AM

VIDEO | धुळे जिल्ह्यात वादळी पावसासह गारपटीचा कहर, बळीराज्याच्या 1282 हेक्टरवरील पिकांना फटका, पंचनामे अद्याप बाकी शेतकरी व्यथित

धुळे : जिल्ह्यात वळव्याच्या वादळी पावसासह गारपटीचा कहर सुरूच आहे. अवघ्या तीन दिवसात झालेल्या वादळी पावसामुळे 35 गावांतील सुमारे 2486 शेतकऱ्यांच्या 1282 हेक्टर वरील पिकांना त्याचा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान हे धुळे तालुक्यात झाले. मार्च महिन्यापासून वादळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात कहरच केला आहे. टप्प्याटप्प्याने पडलेल्या या पावसामुळे हजारो हेक्टरचा नुकसान धुळे जिल्ह्यात झाला आहे तर दुसरीकडे तीन दिवसातच झालेल्या पावसामुळे सुमारे 1282 पिकांना मोठा फटका बसला आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या काही भागातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप बाकी आहे. तर त्याची मदत मिळत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा धुळे जिल्ह्याला 27 ते 29 एप्रिल दरम्यान पावसाने झोपून टाकले. जिल्ह्यातील वीस गावातील 839 शेतकऱ्यांच्या 492  हेक्टरवरील कांदा, ज्वारी, बाजरी, टरबूज, लिंबू ,पपई आदी पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील पिकांचे नुकसान झाल्याचं कृषी खात्याचा अहवालात नमूद करण्यात आला आहे.

Published on: May 04, 2023 09:22 AM