जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, घराचे पत्रे उडाले तर झाडं कोसळ्यानं रस्ते बंद

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, घराचे पत्रे उडाले तर झाडं कोसळ्यानं रस्ते बंद

| Updated on: Apr 30, 2023 | 9:37 AM

VIDEO | अवकाळीनं जळगाव जिल्ह्याला झोडपलं, अनेक घरांचे वादळी वाऱ्याच्या पावसात पत्रे उडाले, नागरिकांची झाली दैना

जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील जळगाव, नांदेड, अमरावती, बीड, नाशिक या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेलं पीकं अवकाळी पावसाने वाया गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केल्याचे पाहायला मिळत आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात जिनिंगची भिंत कोसळल्याने या भिंतीखाली सायकलवरून जाणाऱ्या 60 वर्षीय ज्ञानदेव मोतीराम पाटील या सुरक्षारक्षकाचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालाय. ज्ञानदेव पाटील हे जळगाव मनपा आयुक्तांच्या निवासस्थानावर सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. दरम्यान ड्युटी आटोपून ते सायकलने आपल्या घराकडे जात असताना त्याच वेळी जिनिंगची भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याची दुर्दैवी घटना घडलीय या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Published on: Apr 30, 2023 09:37 AM