Special Report | आभाळ फाटलं अन् शिवार कोमेजलं, राज्यभरात अवकाळीचा फटका
VIDEO | राज्यभरात अवकाळी पावसाचा फटका; शेतात गारांचा खच, पिकांचं मोठं नुकसान आणि बळीराजाची दैना
मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसानं कहर केलंय. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला. अवकाळी पावसाने पिकांचं मोठं नुकसानं झालं तर या संकटामुळे शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. गारांचा खच शेतात पाणीच पाणी त्यामुळे पिकांची नासाडी झाली. पशुधनाची हानी झाली तर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली आहे. गारपीठमुळे भाजीपाल्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालं. बुलढाण्यात अवकाळी पावसानं फळबागांना मोठा फटका बसला असून शेतकरी आर्थिक संकंटात सापडले आहे. चिखली, मेहेकर, सिंदखेडराजा भागातही शेतकरी उद्धवस्त झाले. तर हिंगोलीमध्ये हळद उत्पादकांची चांगलीच धांदल उडाली. नांदेडमध्ये अवकाळी पावसाने शहर पूर्णतः ठप्प झाले. परभणीमध्ये जोरदार पावसाने गारपीटने थैमान घातले. अमरावतीमध्ये कांदा, वांगी, लिंबू आणि गहू यापिकांची शेतं जमीनदोस्त झाले. तर काही ठिकाणी जीवित हानी देखील झाली. बघा स्पेशल रिपोर्ट