मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी, ५ मेपर्यंत 'या' राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी, ५ मेपर्यंत ‘या’ राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

| Updated on: Apr 30, 2023 | 8:24 AM

VIDEO | मुंबईतील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, तर ५ मेपर्यंत 'या' राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई : कालपासून मुंबईसह इतर उपनगर परिसरात ढगाळ वातावरण बघायला मिळत असून आजही सकाळपासून मुंबईतील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. तर संपूर्ण राज्यात ५ मेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई शहरासह मुंबईतील पश्चिम उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने सकाळीच मुंबईकरांची तारांबळ उडाली. तर मुंबईतील हवामान हे संमिश्र स्वरूपाचे पाहायला मिळत आहे. कालही मुंबई उपनगरातील अनेक भागात सकाळी अवकाळी पाऊस झाला. मुंबई आणि आसपासच्या भागात सकाळपासून ढगाळ वातावरण होते जे आजही आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात काल सकाळी साडे सहा वाजेनंतर काहीसा जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. सुमारे 15 मिनिटे मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.

Published on: Apr 30, 2023 08:23 AM