अवकाळीनं साताऱ्यात धुक्याची चादर, बघा मन प्रफुल्लित करणारं दृश्य
VIDEO | साताऱ्यातील तापोळा बामणोली परिसर धुक्याने निघाला न्हाऊन, या भागातील डोंगर रांगा धुक्याने पांढर्या शुभ्र... बघा मनमोहक दृश्य
सातारा : अवकाळी पावसानंतर साताऱ्यात पहाटे सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. साताऱ्यातील तापोळा बामणोली परिसरही सध्या धुक्याने न्हाऊन निघाला आहे. या भागातील डोंगर रांगा धुक्याने पांढर्या शुभ्र झाल्या आहेत. गेल्या चार दिवसापासून सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसानंतर वातावरणामध्ये पूर्णतः बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर जावली तालुक्यातील सह्याद्री नगर या ठिकाणाहून ही धुक्याची चादर पर्यटकांना पहायला मिळत असून ती पर्यटकांना खुनवत भूरळ घालत आहे. या अल्हाददायक निसर्गाचा अद्भुत चमत्कार अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी आता साताऱ्यातील काही भागात होत आहे. बघा मन प्रफुल्लित करणारं दृश्य
Published on: Mar 20, 2023 04:58 PM
Latest Videos