ऐन उन्हाळ्यात भर पावसाळा, ठाण्यात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी

ऐन उन्हाळ्यात भर पावसाळा, ठाण्यात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी

| Updated on: Apr 29, 2023 | 11:26 AM

VIDEO | ठाणे शहरात हवामान खात्याच्या अंदाजानूसार अवकाळी पावसाच्या सरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

ठाणे : महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याचा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज सकाळी ठाण्यात देखील काही प्रमाणात तुरळक पावसाच्या सरी बरसलेल्या पाहायला मिळाल्या. ऐन उन्हाळ्यात पडलेल्या या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला तर उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देखील मिळाला. सकाळी पडणाऱ्या पावसामुळे चाकरमान्यांना मात्र छत्रीचा आधार घ्यावा लागला. दहा मिनिटे पडलेल्या पावसामुळे ठाणे शहरातील रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले. तर मुंबई उपनगरातील अनेक भागात आज सकाळी अवकाळी पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई आणि आसपासच्या भागात देखील सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. आज सकाळी साडे सहा वाजेनंतर काहीसा जोरदार अवकाळी पाऊस झाला. मुंबई उपनगरातील परिसरात सुमारे 15 मिनिटे मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. मुंबईतील चाकरमान्यांची सकाळी कामावर जाण्याची घाई असताना अवकाळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Published on: Apr 29, 2023 11:26 AM