निसर्गाच्या लहरीपणावर मात, नंदूरबारच्या शेतकऱ्याची कमाल, का होतेय चर्चा?
VIDEO | निसर्गाचा लहरीपणा तरीही 'त्यानं' शेतीतून लाखोंचं उत्पन्न, काय केली कमाल?
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने होणारा अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान होत आहे. मात्र या सर्व संकटांवर मात देत नंदुरबार तालुक्यातील विजय माळी या शेतकऱ्यांनी वांग्यांची यशस्वी शेती करून दाखवली आहे. लाख रुपयाचे उत्पन्न घेतला आहे. शेती परवडत नाही असे अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते परंतु योग्य नियोजन राहिला तर भाजीपाल्यांच्या शेतीतून लाखो रुपयांच्या याच्यात नफा देखील येऊ शकतो, विजय माळी या शेतकऱ्यांसारखे अनेक शेतकऱ्यांनी नियोजनबध्द पध्दतीने शेती केली तर कधीही शेतकरी उपाशी राहणार नाही. तर शेतीमध्ये योग्य पाण्याच्या, खताचा नियोजन आणि मेहनत केली की सर्व शक्य असतं, याचं उत्तम उदाहरण नंदुरबार शहरातील माळीवाडा राहणाऱ्या विजय माळी या शेतकऱ्यांनी आपल्या साडेतीन एकर क्षेत्रावर मेघना या वांग्यांची वाणाची लागवड केली होती, यासाठी त्यांनी एक लाख तीस हजार रुपये खर्च करून आतापर्यंत अडीच लाखांपर्यंचे उत्पन्न घेतले असून, अजून एका लाखाचे वांगे विकण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्याने केलेला खर्च वजा जाता एक लाख ५० हजार निवड नफा निघणार आहे, असे विजय माळी यांनी सांगितले, कशा पद्धतीने नियोजन केलं आहे यावरच्या एक खास यशोगाथा…