हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात 11 केंद्रांना मान्यता; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

| Updated on: Mar 17, 2023 | 8:49 AM

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेड तर्फे हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात 11 केंद्रांना मान्यता देण्यात आली

बुलढाणा : राज्यात एकीकडे अवकाळीमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असतानाच बुलढाण्यात शेतकऱ्यांसाठी दिलासा दायक बातमी आहे. जिल्ह्यातील हरभरा उत्पादकांसाठी जिल्ह्यात 11 केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेड तर्फे हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात 11 केंद्रांना मान्यता देण्यात आली असून, 14 मार्च ते 11 जून पर्यंत हरभरा खरेदी सुरु राहणार आहे. मान्यता देण्यात आलेल्या 11 खरेदी केंद्रामध्ये, तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, लोणार, मेहकर, शेगाव, संग्रामपूर, कृषि उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर केंद्र – वरवंड बकाल, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खुर्द केंद्र- साखरखेर्डा, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था, चिखली, बिबी फार्मर प्रोड्युसर कंपनी, किनगाव जट्टू, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, सिंदखेडराजा या केंद्राना मान्यता देण्यात आली आहे.

Published on: Mar 17, 2023 08:48 AM
धुळ्यात अवकाळी पावसामुळे 56 गावं बाधित
महिलांनो… आजपासून ‘लालपरी’तून करा 50 टक्के फ्री प्रवास