Special Report | मविआ सरकार VS 73 हजार एसटी संपकरी

| Updated on: Nov 30, 2021 | 9:15 PM

एसटी सेवा सुरु झाली असली तरी अद्याप 73 हजार कर्मचारी संपावर ठाम आहेत. निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन काही कर्मचारी कामावर रुजू झाले.

मुंबई: जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे, असं एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. एसटी सेवा सुरु झाली असली तरी अद्याप 73 हजार कर्मचारी संपावर ठाम आहेत. निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन काही कर्मचारी कामावर रुजू झाले. कामगार नेते शशांक राव यांनी पिंपरी चिंचवडमध्ये उपोषण सुरु केले आहे. मुंबईत उपोषणाला परवानगी नाकारल्याने राव पिंपरी चिंचवडमध्ये उपोषणाला बसले असून एसटीचे विलिनीकरण झाल्याशिवाय उपोषण संपणार नाही असे राव यांनी स्पष्ट केले.