Lakhimpur Kheri Case | शेतकऱ्यांवर हल्ला, हल्ल्यातील आणखी एक व्हिडीओ समोर

Lakhimpur Kheri Case | शेतकऱ्यांवर हल्ला, हल्ल्यातील आणखी एक व्हिडीओ समोर

| Updated on: Oct 06, 2021 | 12:10 AM

उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात आंदोलन करणाऱ्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील  लखीमपूर खीरी  इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आला. त्यानंतर आता काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्षासह सर्वांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने अंगावर गाडी घालण्याचा पराक्रम गाजवला असा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यानंतर आता काँग्रेसने सोमवारी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. लखीमपूर खीरी इथला हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडीओ विविध राजकीय पक्षांकडून लखीमपूरमधला असल्याचा सांगत शेअर केला जात आहे. टीव्ही 9 मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

Published on: Oct 05, 2021 06:55 PM