आमदार लढणार खासदारकी? काय आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती?

आमदार लढणार खासदारकी? काय आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती?

| Updated on: Oct 01, 2023 | 11:01 AM

VIDEO | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या रिंगणात भाजपचे दिग्गज नेते उतरणार असल्याची चर्चा सुरू असून महाराष्ट्रात आमदारांना भाजपकडून खासदारकीचं तिकीट देण्यात येणार आहे तर भाजप आपल्या ६ ते ७ आमदारांना लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवणार आहे.

मुंबई, १ ऑक्टोबर २०२३ | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कबर कसलीये. उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक ४८ जागा आहे. त्यापैकी ४५ जागांचं लक्ष्य भाजपचं आहे. त्यासाठी काही आमदारांना लोकसभेत उतरवण्याची तयारी भाजपनं केली असल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या ४५ प्लस मिशनसाठी भाजपकडून मोठी रणनिती आखली जात असून भाजप काही आमदारांनाच खासदारकीचं तिकीट देऊन लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे, अशी चर्चा आहे. तर ६ ते ७ आमगारांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट देण्यात येणार असल्याचे कळतंय. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आकाश फुंडकर, राम सातपुते, रवींद्र चव्हाण, संजय केळकर आणि राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरूये. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चाचपणी सुरू करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर यावरून जयंत पाटील यांनी टोला लागवलाय. नको असलेल्या नेत्यांना दिल्लीत पाठवण्याची भाजपची प्रथा असल्याचे त्यांनी म्हटलंय.

Published on: Oct 01, 2023 10:49 AM