UPSC Results 2021: नाशिकचा अक्षय वाखारे म्हणतो,'योग्य नियोजन इज द ओन्ली सोल्युशन!'

UPSC Results 2021: नाशिकचा अक्षय वाखारे म्हणतो,’योग्य नियोजन इज द ओन्ली सोल्युशन!’

| Updated on: May 30, 2022 | 7:21 PM

अंकिता अग्रवाल दुसऱ्या, गामिनी सिंगला तिसऱ्या आणि ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात सुद्धा यूपीएससीच्या यादीत आलेले बरेच उमेदवार आहेत त्यातीलच एक अक्षय वाखारे!

पुणे: यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस (UPSC Civil Services) 2021 परीक्षेचा निकाल जाहीर (UPSC 2021 Final Result) करण्यात आलाय आणि इतर परीक्षांप्रमाणेच या परीक्षेत सुद्धा मुलींनी बाजी मारलीये! श्रुती शर्माने ऑल इंडिया पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही मुलींनी स्थान पटकावलं आहे. अंकिता अग्रवाल दुसऱ्या, गामिनी सिंगला तिसऱ्या आणि ऐश्वर्या वर्मा चौथ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात सुद्धा यूपीएससीच्या यादीत आलेले बरेच उमेदवार आहेत त्यातीलच एक अक्षय वाखारे! यूपीसीएसी निकालात नाशिकचा अक्षय वाखारे (Akshay Wakhare UPSC Nashik) देशात 203 वा आलेला आहे. अक्षयचा हा तिसरा प्रयत्न होता. अक्षय पुण्यातील युनिक अकॅडमीचा तिसऱ्या वर्षीय बॅचचा विद्यार्थी आहे. मिळालेल्या यशाबद्दल बोलताना अक्षय म्हणतो, अभ्यासाचं योग्य नियोजन केल्यामुळे यश मिळालं आहे.

Published on: May 30, 2022 07:21 PM