Chhagan Bhujabal : मंत्रिमंडळात मंत्रिपद नाही, नाराज छगन भुजबळ म्हणाले, ‘मला डावललं, फेकलं काय फरक पडत नाही…’
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्याचे लक्ष लागलेलं अशताना काल रविवारी देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्याचे लक्ष लागलेलं अशताना काल रविवारी देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. यामध्ये काही दिग्गज नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना देखील महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच आज छगन भुजबळांनी मंत्रिपदाबाबतची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. भुजबळ म्हणाले, ‘मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय काही फरक पडत नाही. मंत्रिपद किती वेळा आलं आणि गेलं पण भुजबळ काही संपला नाही.’, असं वक्तव्य करत भुजबळांनी पक्षश्रेष्ठींवर बोट ठेवत इशारा दिलाय. पुढे ते असेही म्हणाले, मला डावललं त्यांना विचारा ना… मंत्रिपद मिळाले नाही, त्यानंतर अजित पवार यांच्याशी काही चर्चा झाली का? असा सवाल केला असता भुजबळ म्हणाले, मी कालपासून काही चर्चा केली नाही. मी कुणाशी बोललो नाही. पुढे काय करायचं माझ्या लोकांशी, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी मी बोलून निर्णय घेणार आहे.