चित्रा वाघ यांनी मारण्याची धमकी दिली, उर्फी जावेदची राज्य महिला आयोगाकडे तक्रार; म्हणाली...

चित्रा वाघ यांनी मारण्याची धमकी दिली, उर्फी जावेदची राज्य महिला आयोगाकडे तक्रार; म्हणाली…

| Updated on: Jan 15, 2023 | 3:05 PM

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या विचित्र फॅशनवर आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी मला मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार उर्फीने महिला आयोगाकडे केली.

उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून आणि तिच्या विचित्र फॅशनवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि उर्फी जावेद विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. या पार्श्वभूमीवर उर्फी जावेदने थेट महिला आयोगाचे दार ठोठावले आहे. चित्रा वाघ यांनी मला मारण्याची धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप उर्फीने केला.

चित्रा वाघ यांच्या विरोधात उर्फीने राज्य महिला आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात असे म्हटले की, चित्रा वाघ यांच्या चिथावणीमुळे माझ्या जीवाला धोका आहे, माझ्यावर हल्ला होऊ शकतो. इतकेच नाही तर मला सुरत्रा मिळावी, अशी मागणी देखील उर्फीने राज्य महिला आयोगाकडे केली आहे. राज्य महिला आयोगाकडे दाखल केलेल्या या तक्रारीनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेदचा सुरू असलेला वाद आता आणखी विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published on: Jan 15, 2023 03:01 PM