Urfi Javed : चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फीनं नोंदवला पोलिसांत जबाब; म्हणाली, ‘पसंतीचे कपडे…’
पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर उर्फीनं पोलीस ठाण्यात हजेरी लावली आणि चौकशीनंतर पोलिसांत जबाबही नोंदवला. मी भारताची नागरिक आहे. मला माझ्या पसंतीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे. असे उर्फी जावेदने स्पष्ट म्हटले आहे. अजून काय म्हणाली उर्फी पोलिसांत जबाब देताना बघा व्हिडिओ...
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ या उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. जो पर्यंत उर्फी तोकडे कपडे घालणं सोडणार नाही आणि अंगप्रदर्शन करणं थांबवणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. दरम्यान, चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली. दरम्यान शनिवारी तिला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावून अंबोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही दिले.
कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर उर्फीनं पोलीस ठाण्यात हजेरी लावली आणि चौकशीनंतर पोलिसांत जबाबही नोंदवला. मी भारताची नागरिक आहे. मला माझ्या पसंतीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे. हा अधिकार मला राज्यघटनेने दिला असून मी जे कपडे घालते ते माझ्या पसंतीने घालते. असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाही, असे उर्फी जावेदने स्पष्ट म्हटले आहे. अजून काय म्हणाली उर्फी पोलिसांत जबाब देताना बघा व्हिडिओ…