Special Report | मनोहर पर्रिकरांचा मुलगा ‘सेने’त की ‘आप’मध्ये?
पणजीच्या उमेद्वारीवरून आत्ता उत्पल परिकर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असा नवा वाद रंगलाय. अमित शहा यांनी समजावऊन देखील उत्पल पर्रीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पणजीतून भाजपने आमदार बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्याचे जवळपास निश्चित केले आहे.
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचं सध्या चर्चेत आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मोनहर पर्रीकर यांचे ते सुपुत्र आहेत. यावेळच्या निवडणुकीत भाजपकडून (BJP) त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झालंय. पणजीच्या उमेद्वारीवरून आत्ता उत्पल परिकर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असा नवा वाद रंगलाय. अमित शहा यांनी समजावऊन देखील उत्पल पर्रीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पणजीतून भाजपने आमदार बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे नाराज झालेले दिवंगत मनोहर परिकर यांचे पुत्र उत्पल परिकर यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, परिकर यांनी निवडणूक लढवू नये यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिकर यांना दिल्लीत बोलावून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उत्पल परिकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.