Utpal Parrikar यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावं : Sanjay Raut
येत्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर(Utpal Parikar) यांच्या उमेदवारीवरून सद्या जोरदार राजकारण तापलं आहे.
येत्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर(Utpal Parikar) यांच्या उमेदवारीवरून सद्या जोरदार राजकारण तापलं आहे. भाजपने त्यांना पणजी सोडून दुसऱ्या दोन मतदारसंघातून लढण्याचे पर्याय दिल्याची माहिती समोर आली आहे तर, त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनीही फडणवीसांना पुन्हा चिमटे काढले आहेत. भाजपने त्यांच्या कार्यक्रर्त्याला काय पर्याय दिले ? ते त्याने स्वीकारावेत की नाही ? यावर मी काय बोलणार ! त्यांचा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात हुशार आहेत. आम्ही महाराष्ट्रत पाहिले आहे. त्यांचे काम…एखाद्याचे मन वळवण्यात ते पटाईत आहेत. पण उत्पल त्यांचे ऐकत नसतील तर त्याची कारणे काय आहेत? हे गोव्याच्या जनतेला माहीत आहे. पणजीचे नेतृत्व विधानसभेत कोणत्या प्रवृत्तीने करावे असा प्रश्न उत्पल यांनी उपस्थित केलाय. ज्याला राजकीय चारित्र्य म्हणतात ते जपण्याचा मनोहर पर्रीकर यांनी प्रयत्न केला. एक आदर्श निर्माण केला. त्यांचे आमचे राजकीय मतभेद होते, पण राजकीय चारित्र्य त्यांनी नेहमी जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मतदार संघाचे नेर्तृत्व कोणत्या चरित्र्याने करावा हा प्रश्न उत्पल पर्रीकर यांनी उपस्थित केलाय. हे लक्षात घ्या ते गंभीर आहे. असे चिमटे राऊतांनी फडणवीसांना काढले आहेत.