'मी मंत्री होणार होतो पण भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला', उत्तम जानकरांचा रोख कोणावर?

‘मी मंत्री होणार होतो पण भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला’, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?

| Updated on: Oct 07, 2024 | 2:53 PM

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याची घोषणा शनिवारी केली होती. तर आज इंदापूर येथे शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतली. त्यामुळे आता दत्ता भरणे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील यांचं आव्हान उभं ठाकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात उत्तम जानकर यांनी जोरदार फटकेबाजी करत अजितदादा गटाचे आमदार दत्ता भरणे यांच्यावर नाव न घेता टीका केली. इतकंच नाहीतर त्यांनी महायुती सरकारवरही निशाणा साधला. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी उत्तम जानकर म्हणाले, इंदापुरात आजच विजयी सभा बोलवली आहे, सगळं असंच वातावरण तयार झालं आहे तर दत्ता भरणेंवर निशाणा साधताना जानकर म्हणाले, ‘साहेबांनी मामांवर बुलडोझर फिरवला. साहेब मला मंत्री करणार होते. पण भरधाव भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला.’, असा निशाणा त्यांनी साधला तर पुढे ते असेही म्हणाले, दत्ता भरणे यांनी आमच्या जिल्ह्यासाठी ५ रूपये दिले नाहीत पण इंदापूरमध्ये ५ हजार कोटी निधी आणि पाच टक्के कमिशन गोळा करून २५० कोटी कमिशन त्यांनी घेतल्याचा हल्लाबोल उत्तम जानकरांनी केला. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले उत्तम जानकर?

Published on: Oct 07, 2024 02:53 PM