माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात, तर विशेष विमानाने ‘या’ 4 नेत्याची तडकाफडकी भेट
आज संध्याकाळी वेळापुरात बैठक घेऊन उत्तम जानकर करणार आहेत. तर उत्तमराव जानकरांसह रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरेंनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस हे स्वतः मैदानात उतरले आहेत. तर जानकरांचा पवारांसोबत संपर्क झाल्यानंतर भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत.
सोलापूरचे नेते उत्तमराव जानकरांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. आज संध्याकाळी वेळापुरात बैठक घेऊन उत्तम जानकर करणार आहेत. तर उत्तमराव जानकरांसह रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरेंनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस हे स्वतः मैदानात उतरले आहेत. उत्तम जानकर, रणजित निंबाळकर, जयकुमार गोरे, शहाजी पाटील हे चार नेते विशेष विमानाने नागपुरात आज दाखल झालेत आणि त्यांनी तडकाफडकी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. रणजित निंबाळकर, जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्ंयांदा भेट घेतली. माढ्यासाठीचा असलेला तिढा अखेर सुटला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अमित शाहांसोबत भेट घडवून देण्याचं उत्तम जानकरांना आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. तर जानकरांचा पवारांसोबत संपर्क झाल्यानंतर भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत.