उत्तर प्रदेशातील बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ अन्…
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारानंतर प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर जो कोणी कायद्याशी खेळ करेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी केले आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची घटना ताजीच असताना उत्तर प्रदेशातून मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये देवी मूर्ती विसर्जनावेळी गोळीबाराची घटना घडली आहे. मूर्ती विसर्जनावेळी झालेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये संतप्त जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्यात आली आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. या तणावाच्या परिस्थितीनंतर उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये हिंसाचारग्रस्त भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बघा व्हिडीओ….
Published on: Oct 14, 2024 04:46 PM
Latest Videos