Video : नाल्याचा अंदाज आला नाही, स्कूटी पाण्यात घातली आणि दाम्पत्य थेट गटारातच घुसलं! घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Bike Accident Video : रस्त्याशेजारी असलेल्या नाल्यात हे दाम्पत्य स्कूटीसह बुडाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) एक व्हिडीओ समोर आला आहे. नाल्याचा अंदाज न आल्यानं एक दाम्पत्य थेट नाल्यात पडलं. स्कूटीसह हे दाम्पत्य नाल्यामध्ये कोसळलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झालाय. पाण्यात स्कूटी घेऊन येणं दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेल्या महिलेलाही भारी पडलं. दोघंही नाल्यात कोसळली. यात दोघांनाही जखम झाली. रस्त्याशेजारी असलेल्या नाल्यात हे दाम्पत्य (Bike Accident Video) स्कूटीसह बुडाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. पावसामुळे नाले तुडुंब भरलेत. रस्त्यांचीही चाळण झाली. खड्ड्यांवर भरलेलं पाणी रस्त्याच्या कडेपर्यंत साचलं गेलंय. त्यामुळे रस्त्याला तळ्याचं रुप आलं होतं. दरम्यान, रस्ता असावा, असं मनात धरुन दुचाकीस्वारानं स्कूटी पुढे नेली. मात्र पाण्यात गाडी चालवणं किती धोकादायक असतं, हे या व्हिडीओ पुन्हा अधोरेखित झालं. या घटनेमुळे पावसात पाण्यातून, खड्ड्यांमधून दुचाकी चालवणं शक्यतो टाळावं, असं आवाहन केलं जातंय. पाहा व्हिडीओ…